Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने ट्रिपल तलाकची (Triple Talaq) पोस्टाने पाठविली नोटीस; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | दुसर्या महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाचा (Immoral Relationship) जाब विचारल्याने मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. तसेच पोस्टाने ट्रिपल तलाकची (Triple Talaq Notice) नोटीस पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अख्तर खान (वय ४५), दोस्त खान (वय ६६) आणि नुरजहान खान (वय ६२) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अख्तर खान याच्याबरोबर विवाह झाला. घरातील कामावरुन तसेच लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, या कारणावरुन फिर्यादी यांचा छळ केला जात होता. अख्तर खान याचे दुसर्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा फिर्यादी यांना संशय होता. त्याचा जाब विचारल्याचे कारणावरुन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीस पोस्टाने ट्रिपल तलाकची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे पोलिसांनी मुस्लिम महिला कायदा (Muslim Women Act) २०१९ सह कौटुंबिक छळाखाली गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Kondhwa Police Station – Triple Talaq notice sent by post for
asking about immoral relationship; A case has been registered against
the three including the husband
- तोतया IAS Officer पोलिसांच्या जाळ्यात; पंतप्रधान कार्यालयात (PMO)
सेक्रेटरी असल्याचे सांगून फसवणूक - 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Chhatrapati Sambhajinagar Police Inspector / ACP Transfers | छत्रपती संभाजीनगर पोलिस
दलातील 10 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या, नियुक्त्या - Aundh Road-Khadki Railway Junction | खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत
संयुक्तपणे कारवाई करा – जिल्हाधिकारी
The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने ट्रिपल तलाकची (Triple Talaq) पोस्टाने पाठविली नोटीस; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.