Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – डबा न दिल्याने मारहाणीत पत्नीचा मृत्यु; पोलिसांनी पतीला केली अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – डबा न दिल्याने मारहाणीत पत्नीचा मृत्यु; पोलिसांनी पतीला केली अटक

 Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station - Wife beaten to death for not giving box; The police arrested the husband

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कामाला जाण्यासाठी डबा बनवून न दिल्याने झालेल्या वादावादीत पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यु झाला. कोंढवा पोलिसांनी (Pune Police Crime News) खूनाचा (Murder) गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सोमनाथ महादेव पांडागळे Somnath Mahadev Pandagale (वय ३०, रा. उंड्री, होले वस्ती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शितल सोमनाथ पांडागळे Shital Somnath Pandagale (वय २७) असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे.

 

याबाबत पोलीस हवालदार संजय देसाई (Police Constable Sanjay Desai) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०६/२३) दिली आहे. ही घटना उंड्रीतील होले वस्तीत शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल पांडागळे हिला फिटचा त्रास असल्याने तिला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आणण्यात आले होते.
डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. पंचनामा करीत असताना तिच्या अंगावर जखमा दिसल्या.
तसेच डॉक्टरांनी महिलेचा मृत्यु मारहाणीमुळे झाल्याचा अहवाल दिला.
त्यावरुन तिचा पती सोमनाथ याच्याकडे चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला.
सोमनाथ याला सकाळी कामाला जायचे होते. तरीही शितल हिने डबा बनवून दिला नाही.
त्यावरुन त्यांच्यात वाद होऊन भांडणे झाली. तेव्हा सोमनाथ याने हाताने व लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पायावर अंगावर मारहाण केली.
त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station – Wife beaten to death for not giving box; The police arrested the husband

 

हे देखील वाचा :

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : लाच घेतल्यानंतर पळून जाताना महिला सरपंच आणि ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांकडून दरोडयाच्या गुन्हयातील आरोपीला अटक (Video)

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – डबा न दिल्याने मारहाणीत पत्नीचा मृत्यु; पोलिसांनी पतीला केली अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article