Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन हात केला फ्रॅक्चर; गुलटेकडीमधील घटनेत दोघांना अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन हात केला फ्रॅक्चर; गुलटेकडीमधील घटनेत दोघांना अटक

Pune Crime News | Swargate Police Station – Youth beaten and fractured in hand due to prior enmity; Two arrested in incident in Gultekdi

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | ४ महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर वस्तीत आलेल्या तरुणाला मारहाण (Beating) करुन त्याचा हात फ्रॅक्चर करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Pune Police Crime News) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

समीर चांद शेख Sameer Chand Sheikh (वय १९) आणि आदित्य संजय मेश्राम Aditya Sanjay Meshram (वय १९, दोघे रा. व्हेईकल डेपो, गुलटेकडी – Gultekdi Pune) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिशांत दत्तात्रय लगाडे (वय २५, रा. काकडे वस्ती, कोंढवा – Kakade Vasti Kondhwa) यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३६/२३) दिली आहे. हा प्रकार गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत रविवारी रात्री साडेआठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि समीर शेख याच्यात ४ महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती.
फिर्यादी हे त्यांचा बालमित्र योगेश खुडे याला भेटण्यासाठी मिनाताई ठाकरे वसाहतीत आला होता.
मोटारसायकलवर बसून गप्पा मारत असताना समीर शेख व आदित्य मेश्राम तेथे आले.
समीर याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर केला.
तेव्हा तो तेथून पळून गल्लीत गेला. आदित्य मेश्राम याने बांबुने त्यांच्या डोक्यात, पाठीवर मारहाण केली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

तो खाली पडल्यावर शेख याने लाथाबुक्कयांनी मारहाण केली. बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात मारला.
त्यानंतर ते वस्तीत आरडाओरडा करीत गेले. पुढे त्यांनी आयसर गाडीच्या काचा फोडल्या. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्याला टाके पडले असून हाताला फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी हाताला प्लास्टर केले असून हाताचे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Swargate Police Station – Youth beaten and fractured in hand due to prior enmity; Two arrested in incident in Gultekdi

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन हात केला फ्रॅक्चर; गुलटेकडीमधील घटनेत दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article