Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने दारू दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने दारू दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली

Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station – A liquor shop was robbed by a gang of inn goons; Stolen cash from street after damaging liquor bottle

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मी आताच जेलमधून सुटुन आलो आहे, तुला हप्ता द्यायचे समजत नाही का अशी धमकी देऊन गुंडांच्या टोळक्याने आंबेगावातील देशी दारुच्या दुकानावर दरोडा टाकला. दुकानातील १० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेताना या टोळक्याने दुकानातील दारुच्या बाटल्या, काचेचे ग्लास, शितपेयांच्या बाटल्या यांचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तिघा सराईतांना अटक केली आहे. (Pune Crime News)

सोहेल मोदीन आसंगी Sohail Modin Asangi (वय २२, रा. इंद्रायणी नगर, जांभुळवाडी), अमोल तानाजी ढावरे Amol Tanaji Dhaware (वय १९, रा. विश्व हाइट, जांभुळवाडी – Jambulwadi Pune), आदित्य ऊर्फ सोन्या खंडु कांबळे Aditya alias Sonya Khandu Kamble (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुंड अजय पांचाळ, तेजस वाडेकर, गोविंद लोखंडे यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हनुमंत धनाजी डोंगरे (वय ३९, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२६/२३) दिली आहे. हा प्रकार आंबेगावातील शनिनगरमधील धीरज परदेशी यांच्या सरकारमान्य देशी दारुचे दुकानात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. (Pune Crime News)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज परदेशी यांचे देशी दारुच्या दुकानात फिर्यादी हे काम करतात. बुधवारी सायंकाळी आरोपी टोळके दुकानात आले. फिर्यादी व मॅनेजर काळे यांना शिवीगाळ केली. मालक कोण आहे, असे विचारुन दुकानाचे मालक धीरज परदेशी यांना अजय पांचाळ याने फोन लावला. तुला कळत नाही का मी आत्ताच जेलमधून सुटुन आलो आहे. तुला कळत नाय काय हप्ता चालु कर, असे बोलून शिवीगाळ केली. दुकानातील दारुचे बाटली, पेयांचे बाटल्या, काचेचे ग्लास यांचे नुकसान केले. दुकानाचे काऊंटरमध्ये दिवसभराचे जमलेले १० हजार रुपये जबरदस्तीने चोरले. दुकानाबाहेर येऊन दुकानाचे दिशेने दगड फेकून आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली आहे.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक धामणे (API Dhamane) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station – A liquor shop was robbed by a
gang of inn goons; Stolen cash from street after damaging liquor bottle

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने दारू दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article