Header

Pune Crime News | भोसरी पोलिसांकडून जबरी चोरी करणार्‍याला अटक

Pune Crime News | भोसरी पोलिसांकडून जबरी चोरी करणार्‍याला अटक

Pune Crime News | Robbery In Pune Bhosari police arrested the thief

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | फुकट कॅटबरीची मागणी केल्यानंतर ती देण्यास बेकरी मालकाने नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून बेकरीच्या काऊंटरची काच फोडून गल्ल्यातील 3 हजार रूपये जबरदस्तीने (Robbery In Pune) चोरून नेणार्‍यास भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

अब्दुल बबलु शेख उर्फ शाहरूख Abdul Bablu Shaikh Alias Shahrukh (रा. वत्सलाबाई काटे चाळ, दापोडी, भासेरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात नरेश गुलाबराव सबनानी (44, रा. नळेनगर, काळेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 मे 2023 रोजी फिर्यादी व त्यांचा कामगार हे बेकरीमध्ये असताना आरोपीने त्यांच्याकडे फुकट बेकरीची मागणी केली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आरोपीच्या मागणीला फिर्यादींनी नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर त्याने बेकरीच्या काऊंटरची काच फोडून नुकसान केले आणि गल्ल्यातील 3 हजार रूपये जबरदस्तीने
चोरून नेले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भास्कर करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Robbery In Pune Bhosari police arrested the thief

The post Pune Crime News | भोसरी पोलिसांकडून जबरी चोरी करणार्‍याला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article