Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – मारहाण करुन दोघा कारचालकांना लुबाडले; बांबु हाऊस आणि कात्रज घाटातील घटना

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – मारहाण करुन दोघा कारचालकांना लुबाडले; बांबु हाऊस आणि कात्रज घाटातील घटना

Pune Crime News | Shivajinagar Police Station – Two car drivers beaten and robbed; Incidents at Bambu House and Katraj Ghat

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कारचालकांने पैसे व मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील दागिने जबरदस्तीने लुटण्याच्या दोन घटना एकाच दिवशी शहरात घडल्या. शिवाजीनगर येथील बांबु हाऊस (Bamboo House, Shivajinagar) आणि कात्रज घाटातील भिलारेवाडी (Bhilarewadi, Katraj Ghat) येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याबाबत गोविंदा साखरे (वय ३५, रा. औरंगाबाद – Aurangabad) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११०/२३) दिली आहे. फिर्यादी हे शिवाजीनगर येथील बांबु हाऊस येथे २८ मे रोजी पहाटे ३ वाजता कार पार्क करीत होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांनी फिर्यादींकडे पैसे व मोबाईल मागितला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्या एका साथीदाराला बोलावून घेतले. त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खाली पाडले. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन जखमी केले. त्यांच्याकडील ३४ ग्रॅमची सोनसाखळी व १० ग्रॅमची सोन्याची अंगठी असा १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीन हिसकावून चौघे पळून गेले. (Pune Crime News)

दुसरी घटना रविवारी पहाटे पावणे दोन वाजता जुना सातारा पुणे रोडवरील (Old Satara Pune Road)
भिलारेवाडी येथील कात्रज घाटाचे मोठ्या वळणाजवळ घडली. याबाबत देवानंद गालफाडे (वय ३८, रा. विले पार्ले)
यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२९/२३)
दिली आहे. फिर्यादी हे भोर येथून कात्रज गाव येथे कारने येत होते. यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांनी हॉर्न वाजवून फिर्यादी यांना कार थांबविण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी कार थांबविल्यावर त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपयांची २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Shivajinagar Police Station – Two car drivers beaten and robbed; Incidents at Bambu House and Katraj Ghat

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

Retired ACP Milind Gaikwad | ‘लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान’ या विषयावरील कार्यशाळेला चांगला प्रतिसाद ! सेवानिवृत्त एसीपी मिलिंद गायकवाड म्हणाले – ‘लाचखोरीची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी प्रयत्न गरजेचे’

Shasan Aplya Dari | कोंढवे धावडे येथे 30 मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – मारहाण करुन दोघा कारचालकांना लुबाडले; बांबु हाऊस आणि कात्रज घाटातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article