Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा?, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर (Pune Lok Sabha Bypoll Election) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) वारंवार दावा केला जात आहे. पुण्यात काँग्रेसपेक्षा (Congress) राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. तर जिंकेल त्याची जागा असं सूत्र संजय राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट केलं आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील पोट निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या 2 जून रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची (Pradesh Congress) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. दरम्यान जनताच जमालगोटा देऊन विरोधकांच्या पोटदुखीचा इलाज करतील असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. यावर बोलताना चव्हाण यांनी शिंदे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
पुण्याच्या पोटनिवडणुकीवर बोलताना अजित पवार म्हणाले, पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अंतर्गत चर्चा करु असं म्हटलं.
तसेच जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
पुणे शहर आणि जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे.
त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही.
निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
Web Title : Pune Lok Sabha Bypoll Election | congress leader ashok chavans reaction on
the pune lok sabha by election
- Wrestlers Protest | बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?, कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाचा
केंद्र सरकारवर हल्लाबोल - पुणे लोकसभा पोटनिवणुकीवरुन मविआत वादाची ठिणगी? जयंत पाटलांची संयमाची भूमिका; म्हणाले- ‘कुणाची ताकद…’
- Chhagan Bhujbal | ‘…मग मंदिरातील उघडेबंब पुजाऱ्यांनी सदरा घालाव’, मंदिरातील ड्रेसकोड
वादावर भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया
The post Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा?, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं appeared first on बहुजननामा.