Header

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती

Sachin Tendulkar | Master Blaster Sachin Becomes State’s ‘Smile Ambassador’; Public awareness against addictions

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Sachin Tendulkar | आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपट्टू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा (Swachh Mukh Abhiyan) ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे अनेक पिढ्यांसाठी व खास करून तरुणांसाठी आदर्शवत आहे. ते आता राज्य शासनाच्या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहेत.

आपल्या राज्यात अनेक लोक खास करुन शालेय व कॉलेजमधील विद्यार्थी गुटखा (Gutkha), तंबाखू (Tobacco), पान मसाला (Pan Masala), सुपारी तत्सम गोष्टींच्या आहारी गेलेले आहेत. यामुळे अनेकांना तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) होत आहे. राज्यातील वाढणारे B स्टेजमधील कॅन्सर (B Stage Cancer) पेशंट आरोग्य खात्याची (Health Department) चिंता वाढवत आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर पर्याय म्हणून राज्य सरकरातर्फे (State Government) ‘स्वच्छ मुख अभियान’ आयोजित केले असून अनेकांचे प्रेरणास्थान असलेले भारतरत्न (Bharat Ratna) सचिन तेंडुलकर हे आता या मोहिमेचा चेहरा बनले आहेत.

 

याबाबातचा सामंजस्य करार (Agreement) राज्य सरकार आणि सचिन तेंडुलकरमध्ये झाला असून हे राज्यातील जनजागृतीचे काम सचिन पूर्णपणे नि:शुल्क करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी सचिन हे ‘स्माइल ॲम्बेसेडर’(Smile Ambassador Of Maharashtra) असतील. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यांनी भारतरत्न सचिन यांचे धन्यवाद मानले असून, त्यांच्या लोकप्रियतेमुळे तरुणांचे व्यसनमुक्ती करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले. इतर काही क्रिकेटर आणि सिनेसृष्टीतील अभिनेते गुटखा, पान सुपारी यांच्या जाहिराती करत असतात मात्र, आपले भारतरत्न सचिन तेंडुलकर हे कधीच असल्या गोष्टींच्या जाहिराती करत नाही. ते कायम भारतरत्न असल्याची जबाबदारी पार पाडत असतात, असे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) उपस्थित होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या कार्यक्रमावेळी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एक किस्सा सांगितला.
त्यांनी वडिलांना दिलेल्या वचनाची आठवण सर्वांना सांगितली.
ते म्हणाले की, मला अजूनही आठवतंय मी शाळेत असताना किंवा मैदानात आपले गुरु आपल्या सेकंड पेरेंट असतात.
पण दुर्दैवाने बरेच शिक्षक गुटखा आणि तंबाखू खात असतात.
लहान मुलं मुली त्यांना बघतात मग कुठे ना कुठे त्यांना पण हे ट्राय करावे असे वाटते आणि ते व्यसन करतात.
त्याचा परिणाम इतका खराब होतो की तोंडाचा कॅन्सर होतो.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मित्रांना मैत्रिणीला वगैरे सर्वांना त्रास होतो’.

सचिन पुढे म्हणाले की, ‘मी 16 व्या वर्षे भारतीय संघात खेळलो.
त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्याकडून वचन घेतले की तू कधीच तंबाखूची जाहिरात करणार नाही’.

Web Title : Sachin Tendulkar | Master Blaster Sachin Becomes State’s ‘Smile Ambassador’; Public awareness against addictions

The post Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article