Header

Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील 36 वर्षीय युवकाचा खून

Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील 36 वर्षीय युवकाचा खून

Pune Crime News | Murder of a 36-year-old youth from Nanded in Sinhagad road area Haveli Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | धारदार हत्याराने सपासप वार करून सिंहगड रस्ता (Sinhagad Raod Pune) परिसरातील नांदेड (Nanded Gaon) येथे राहणार्‍या एका 36 वर्षीय युवकाचा खून (Murder In Pune) करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

राहुल चंद्रकांत आटोळे Rahul Chandrakant Atole (36, रा. गोसावी वस्ती, नांदेड, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. खूनाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस स्टेशनमधील (Haveli Police Station) अधिकारी व पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडमधी गोसावी वस्ती येथे राहणारे राहुल चंद्रकांत आटोळे हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळच्या वेळी परिसरातील नागरिकांनी रोडच्या कडेला असणार्‍या झाडा-झुडपात एक डेडबॉडी पाहिली. नागरिकांनी लागलीच त्याची खबर हवेली पोलिसांना दिली.

घटनेबाबत माहिती समजल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन वांगडे
(Police Inspector Sachin Wangde), पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे
(PSI Dilip Shinde), पोलिस हवालदार अशोक तारू, पोलिस नाईक संतोष भापकर
, प्रवीण ताकवणे आणि राजेंद्र मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणीतरी अज्ञात कारणावरून
धारदार हत्याराने वार करून मृतदेह झाडा-झुडपात टाकून देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आटोळे यांचा खून नेमक्या कोणत्या कारणारून झाला आणि कोणी केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Murder of a 36-year-old youth from Nanded in Sinhagad road
area Haveli Police Station

The post Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील 36 वर्षीय युवकाचा खून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article