Header

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Pune Crime News | Gang Rape On Minor Girl In Kondhwa Police Station Limits Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | खिडकीतून खाली पडलेली वस्तू वर नेऊन देत असताना तिला घरात ओढून घेऊन एका सहावी-सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार (Pune Minor Girl Gang Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार या पिडित मुलीने शिक्षकांना सांगितल्याने उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. ५५५/२३) दिली आहे. हा प्रकार येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडला होता. (Pune Crime News)

फिर्यादी या ६ वी किंवा ७ वीमध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होत्या. त्यावेळी एका घराच्या खिडकीतून काही तरी वस्तू खाली पडली. फिर्यादी या ती वस्तू देण्यासाठी त्या घरात गेल्या. तेव्हा घरात असणार्‍या आरोपींनी तिला घरात ओढून घेतले. आतून कडी लावली. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावले (Crime Against Woman). तिचे कपडे काढून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Pune Gang Rape) केला. त्यानंतर कोणाला काही सांगितले तर तुझे व तुझ्या घरच्यांचे खूप हाल करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे आजवर तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. फिर्यादी यांनी त्यांचे स्कुल शिक्षकास हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Gang Rape On Minor Girl In Kondhwa Police Station Limits Pune

The post Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article