Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – पार्टीला पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दांडके मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात राडा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – पार्टीला पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दांडके मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात राडा

une Crime News | Kondhwa Police Station – Attempt to kill youth by hitting him on the head with a stick for not paying party; The cry of an inn criminal

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | बलात्काराचा गुन्ह्यात अटक (Arrested In Rape Case) केलेल्या व ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital) पळून गेलेल्या कथित भाईने साथीदारासह कोंढव्यात राडा (Rada In Kondhwa) घातला. पार्टीसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करुन जबर जखमी केले. परिसरात दहशत निर्माण केली. (Pune Crime News)

कोंढवा पोलिसांनी अक्षय लोणारे, अनिकेत देशपांडे, दिनेश घाडगे यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 48 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९२/२३) दिली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्दमधील (Kondhwa Khurd) बधे चौकात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आकाश गायकवाड हा बधे चौकात मित्रांसोबत बसला असता आरोपी तेथे आले. त्यांनी त्यास आम्हाला पार्टीसाठी पैसे दे, नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. आकाशने त्यास नकार दिला. तेव्हा अनिकेत देशपांडे व दिनेश घाडगे यांनी हाताने मारहाण केली. अक्षय लोणारे याने आकाशच्या डोक्यात फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. आसपास जमलेल्या लोकांकडे पाहून मोठ मोठ्याने आम्ही इथले भाई आहोत. कोण याला वाचवायला येतो, ते बघू असे म्हणून पुन्हा आकाशला मारहाण करुन हातातील लाकडी दांडके हवेत भिरकावून आमच्याशी पंगा घ्यायचा असे म्हणाल्याने लोक घाबरुन पळून गेले. कोंढवा पोलीस (Pune Cop) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Attempt to kill youth by hitting him on the
head with a stick for not paying party; The cry of an inn criminal

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – पार्टीला पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दांडके मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात राडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article