Pune Crime News | सदशव पठत तरणकडन महवदयलयन तरणवर कयतयन परणघतक हलल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नास नकार दिल्याने एमपीएससी (MPSC) पास झालेल्या दर्शना पवार हिची हत्या (Darshana Pawar Murder Case) करण्याची घटना ताजी असतानाच सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना पेरुगेट पोलीस चौकीपासून (Perugate Police Chowki) काही अंतरावर सकाळी १० वाजता घडली. रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुण आणि जखमी झालेली तरुणी हे एकाच गावात राहणारे आहेत. दोघांचे गावाकडे प्रेमसंबंध (Love Affair) होते. त्यानंतर ही तरुणी शिकण्यासाठी पुण्यात आली. तिने स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
पुण्यात आल्यावर दोघांमधील संबंध कमी झाले. आपल्याला सोडून ती दुसर्याबरोबर असल्याचे या तरुणाला समजले.
त्यामुळे तो गावावरुन पुण्यात आला. त्याने कॉलेजमध्ये जाऊन तिचा शोध घेतला. तिचा पाठलाग करत तो पेरुगेटपर्यंत आला.
तेथे त्याने तिला अडवून विचारले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने कोयत्याने तिच्यावर वार करुन जखमी केले.
रस्त्यावरील लोकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
विश्रामबाग पोलीस (Vishrambaug Police)अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | A young college girl was attacked with a knife by a young man in Sadashiv Peth
- MLA Anil Parab | आमदार अनिल परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल; चौघे अटकेत
- Bakrid Holiday | बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता 29 जूनला
- ACB Trap News | भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
The post Pune Crime News | सदाशिव पेठेत तरूणाकडून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला appeared first on बहुजननामा.