Header

Pune Crime News | मडलगच फट वहयरल करणयच धमक दऊन तरणवर बलतकर; अटरसटच कस करणयच धमक दणरयस अटक

Pune Crime News | मडलगच फट वहयरल करणयच धमक दऊन तरणवर बलतकर; अटरसटच कस करणयच धमक दणरयस अटक

Pune Crime News | Rape of young woman by threatening to spread modeling photos; Threatened to file an atrocity case arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | नाशिक येथे मॉडेलिंगसाठी काढलेले कपल फोटो (Modeling Photo) व्हायरल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून तरुणीला त्याने आपल्या वासनेचे शिकार बनविले. तिने सातत्याने आपल्याशी संबंध ठेवावेत, यासाठी अ‍ॅट्रोसिटीची केस (Atrocity Case) करण्याची धमकी देणार्‍यास चंदननगर पोलिसांनी (Pune Police News) अटक केली आहे. (Pune Crime News)

करण अण्णा पगारे Karan Anna Pagare (वय २५, रा. सामनगाव, नाशिक, सध्या सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९०/२३) दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पगारे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी त्यांचे कपल फोटो (Couple Photo) काढले होते. करण पगारे हा मुळचा नाशिकचा राहणारा आहे. त्यानंतर तो आता पुण्यात राहण्यास आला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो नातेवाईक, आईवडिल यांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन करण पगारे याने या तरुणीला वडगाव शेरी येथील स्टे इन लॉजवर (Stay in Lodge Wadgaon Sherry) नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. त्यानंतरही आपल्याबरोबर शरीर संबंध (Physical Relationship) ठेवावेत, यासाठी त्याने तिच्या कुटुंबियांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीची केस करण्याची व कपल शुटचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. परंतु, फिर्यादी याने त्यास नकार दिला. तेव्हा त्याने हे फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. पोलिसांनी करण पगारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Rape of young woman by threatening to spread modeling photos; Threatened to file an atrocity case arrested

The post Pune Crime News | मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार; अ‍ॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी देणार्‍यास अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article