Header

Pune Crime News | पस मगतलयन गडन पटरल पपवर घतल रड; पपवरल मशनरजवर दगड टकन कल तडफड

Pune Crime News | पस मगतलयन गडन पटरल पपवर घतल रड; पपवरल मशनरजवर दगड टकन कल तडफड

Pune Crime News | A gangster ransacked a petrol pump for asking for money; The pump machinery was vandalized by pelting stones

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्यावर गुंडाने पेट्रोल पंपावर राडा घालून टाकी फुल्ल भरुन घेतली. त्यानंतर दगडाने पंपावरील मशीनरीजची तोडफोड केली. कामगारांनी या कथित भाईला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (Pune Crime News)

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव अंकुश भगत Vaibhav Ankush Bhagat (वय ३०, रा. काळे बोराटे नगर, हडपसर – Kaleborate Nagar, Hadapsar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अमोल भागवत देवकर (वय २७, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१२/२३) दिली आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील जय शंभो पेट्रोल पंपावर (Jai Shambho Petrol Pump Fursungi) गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय शंभो पेट्रोल पंपावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोघे जण
पंपावर आले. त्यांच्या गाडीत शिवाजी सुर्वे यांनी १०० रुपयांचे पेट्रोल भरले.
सुर्वे यांनी पैसे मागितल्यावर त्याने वैभव भगत माझे नाव आहे. माझे कोणी वाकडे करु शकत नाही.
पोलीस येऊ दे नाही तर कोणी पण येऊ दे. मी इथला भाई आहे. टाकी फुल कर, असा दम दिला.
सुर्वे यांनी नकार दिल्यावर त्याने रस्त्याच्या बाजुला असलेला दगड उचलून पंपाच्या मशीनरीजवर टाकून
त्याचे नुकसान करु लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मोटारसायकलची टाकी पूर्ण भरली.
त्यास जाण्यास सांगितले. तरीही त्याने दगड उचलून सर्व पंपाच्या मालमत्तेचे नुकसान करीत होते.
तसेच पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या दोन कारच्या काचांवर मोठ मोठे दगड घालून त्यांचे नुकसान केले. काचा फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. आतील रक्कम चोरी केली. तोपर्यंत कामगारांनी पोलिसांना कळविले. पेट्रोल पंपाचे मालक रविराज देशमुख ही आले. त्यांनी सर्वांनी मिळून वैभव भगत याला पकडून ठेवले. तोपर्यंत पोलीस नाईक कांबळे, भोसले, कुंभार हे तिघे आले. या गुंडाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title : Pune Crime News | A gangster ransacked a petrol pump for asking for money; The pump machinery was vandalized by pelting stones

The post Pune Crime News | पैसे मागितल्याने गुंडाने पेट्रोल पंपावर घातला राडा; पंपावरील मशीनरीजवर दगड टाकून केली तोडफोड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article