Header

Pune Crime News | मेफेनटरमाइन सल्फेट औषध बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दुकानदारास अटक

Pune Crime News | मेफेनटरमाइन सल्फेट औषध बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दुकानदारास अटक

Pune Crime News | Shopkeeper arrested for illegal possession of Mephentermine Sulphate drug

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | बॉडी बिल्डिंगसाठीचे इंजेक्शन (Body Building Injection ) व गर्भपातासाठीच्या गोळ्यांची (Abortion Pills) बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या एका मेडिकल दुकानदाराला (Medical Owner) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) अटक केली आहे.(Pune Crime News)

मंगेश पोपट नरुटे Mangesh Papat Narute (वय ३३, रा. नर्‍हे, आंबेगाव – Ambegaon Pune) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार उंड्रीमधील संगम मेडिकल अँड लॅबमध्ये (Sangam Medical & Lab) १ मे रोजी रात्री पावणे आठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील संगम मेडिकलमध्ये बॉडी बिल्डिंगकामी इंजेक्शन
व गर्भपातासाठीच्या गोळयांची विक्री केली जात असल्याची अमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Drug Squad) माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध विभागाच्या (Food and Drug Department) पथकासह पोलिसांनी दुकानावर बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून छापा घातला. मंगेश नरुटे याचा स्वत:चे डी फार्मसी शिक्षण झाले असतानाही त्याने स्वत:च्या ताब्यात मेफेनटरमाइन सल्फेट (Mephentermine Sulfate) हे इंजेक्शनच्या ८ बाटल्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची ७ पाकिटे विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली. ही औषधे कोणाकडून खरेदी केली. त्याचे खरेदीबिलही त्याच्याकडे आढळून आले नाही. पोलीस निरीक्षक वगरे तपास करत आहे.

Web Title : Pune Crime News | Shopkeeper arrested for illegal possession of Mephentermine Sulphate drug

The post Pune Crime News | मेफेनटरमाइन सल्फेट औषध बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दुकानदारास अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article