Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Gold Rate Today | महाराष्ट्रात सध्या लग्नसराई सुरू असल्याने नागरिकांची सोने-चांदीच्या दागिन्याची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold-Silver Rate Today) चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र आज दरवाढीला ब्रेक लागला असून सोने-चांदी खरेदी करण्यासाठी आज सुवर्णसंधी आहे. सोमवारी (दि.5) सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Pune Gold Rate Today) कोणतीही वाढ झालेली नाही. दोन्ही मौल्यवान धातूंचे दर स्थिर आहेत.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion and Jewelers Association) मते, शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा भाव 60 हजार 308 रुपये होता. सकाळी हा दर 60 हजार 322 रुपये होता. त्यामुळे शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात 14 रुपयांची घसरण झाली होती. तर शुक्रवारी चांदीचा दर 71 हजार 372 रुपये प्रति किलोवर बंद झाला. सकाळी 72 हजार 376 रुपये प्रतिकिलो दर होता. संध्याकाळी चांदीच्या दरात 1004 रुपयांची घसरण झाली.
पुण्यातील आजचे सोने-चांदीचे दर
सोमवारी पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 55 हजार 300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60 हजार 300 रुपये आहे. पुण्यात आज चांदीचा दर 73 हजार रुपये प्रतिकिलो इतका आहे. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि इतर कारणांमुळे बदल होऊ शकतो. (Gold Rate Pune)
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.
Web Title : Pune Gold Rate Today | Pune gold silver price today 5 june 2023 gold silver rate in marathi
- Pune Crime News | येरवडा पोलिस स्टेशन – भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार; येरवड्यातील गांधीनगरमधील घटना
- Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी निधन
The post Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर appeared first on बहुजननामा.