Header

Pune Katraj Zoo | पण : कतरज यथल रजव गध परण सगरहलयलगत पण महपलक उभरणर डगपरक

Pune Katraj Zoo | पण : कतरज यथल रजव गध परण सगरहलयलगत पण महपलक उभरणर डगपरक

Pune Katraj Zoo | Pune Municipal Corporation to set up ‘Dog Park’ near Rajiv Gandhi Zoological Park in Katraj IAS Ravindra Binwade

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Katraj Zoo | कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road) कडेला असलेल्या जागेमध्ये महापालिकेच्यावतीने पीपीपी तत्वावर ‘डॉग पार्क’ (Dog Park In Katraj Zoo) उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला महापालिका आयुक्तांनी नुकतेच प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिली. (Pune Katraj Zoo)

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जागेतून कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर (Katraj Dehuraod Bypass) वडंरसिटी ते राजस सोसायटी (Wonder City To Rajas Society) दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे पुलालगतचे सुमारे साडेतीन एकरचे क्षेत्र विनावापर राहाणार आहे. याठिकाणी अतिक्रमण होउ नये, यासाठी येथे डॉग पार्क करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Katraj Zoo)

यामध्ये डॉग पॉंड, जॉगींग ट्रॅक तसेच डिस्पेन्सरी अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याठिकाणी प्रवेशासाठी दर आकारणी करण्यात येईल. पीपीपी तत्वावर हा डॉगपार्क उभारण्यात येणार असून प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. कात्रज व दक्षिण पुण्यातील श्‍वानप्रेमींसाठी हे डॉगपार्क उपयुक्त ठरेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

Web Title : Pune Katraj Zoo | Pune Municipal Corporation to set up ‘Dog Park’ near Rajiv Gandhi Zoological Park in Katraj IAS Ravindra Binwade

The post Pune Katraj Zoo | पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयालगत पुणे महापालिका उभारणार ‘डॉगपार्क’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article