Header

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल : मुदत उलटल्यानंतरही ठेकेदार कंपनीने लेटर ऑफ इंटेट दिले नाही, महापालिका प्रशासकांच्या निर्णयाकडे लक्ष

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल : मुदत उलटल्यानंतरही ठेकेदार कंपनीने लेटर ऑफ इंटेट दिले नाही, महापालिका प्रशासकांच्या निर्णयाकडे लक्ष

Pune PMC Warje Multispeciality Hospital | Even after the deadline, the contractor company did not give letter of intent, attention to the decision of the Pune municipal administrators

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे येथे डीबीएफओटी तत्वावर (On Design, Build, Finance, Operate and Transfer (DBFOT) Basis) उभारण्यात येणार्‍या ३५० बेडस्चे हॉस्पीटल उभारण्यासाठी ठेकेदार कंपनीसाठी (Contractor Company) महापालिकेच्या नावे तब्बल ३६० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी प्रशासक काळात स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना संबंधित ठेकेदाराने ४५ दिवसांत लेटर ऑफ इंटेट देण्याची अट घालण्यात आली होती. परंतू ही काल मर्यादा संपून आठवडा उलटला असला तरी ठेकेदाराने महापालिकेशी साधा संपर्कही साधला नसून महापालिकेने Pune Municipal Corporation अद्याप कुठलिही मुदतवाढ न दिल्याने प्रशासन ठेकेदारावर कोणाच्या दबावाखाली ‘मेहेरबान’ होत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Pune PMC Warje Multispeciality Hospital)

वारजे येथील महापालिकेच्या जागेवर बांधा वापरा व हस्तांतरीत करा (DBFOT) या तत्वावर ३५० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. यासाठी ३६० कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी ठेकेदार काढणार असलेले कर्ज महापालिकेच्या नावावर काढण्याचा तुघलकी निर्णय प्रथमच महापालिकेने घेतला आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी (BJP Corporator) दिलेल्या महापालिकेच्या नावे कर्ज घेण्याच्या उपसूचनेला मान्यता देताना मात्र, राज्य शासनाने कुठलिही जबाबदारी घेणार नसल्याचे सांगत यापुर्वीच हात वर केले आहेत. यानंतरही प्रशासकांनी फेब्रुवारीमध्ये यासाठी आलेली निविदा मान्य केली आहे. एवढेच नव्हे तर या संपुर्ण प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागारासाठी ५५ लाख रुपये देण्याचा प्रस्तावही स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्य केला आहे. ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास विरोधी पक्षांसह काही स्वंयसेवी संस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यानंतरही महापालिकेने कर्ज काढून महापालिकेचे पतमानांकन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात (Pune Court) जाण्याचा इशाराही दिला आहे. (Pune PMC Warje Multispeciality Hospital)

 

हॉस्पीटल उभारणीची निविदा मान्य करताना पुढील ४५ दिवसांमध्ये पात्र ठरलेल्या ठेकेदार कंपनीने लेटर ऑफ इंटेन देण्याची अट घालण्यात आली होती. ही कंपनी कर्ज कोणत्या आंतरराष्ट्रीय बँकेकडून घेणार, व्याजदर काय असेल, या कर्जासाठी कोणत्या कंपनीकडे विमा उतरवणार याबाबतचे सविस्तर विवेचन या पत्रामध्ये अपेक्षित आहे. परंतू ठेकेदार कंपनीने अटीप्रमाणे २५ मे पर्यंत महापालिकेला लेटर ऑफ इंटेन दिलेले नाही. तसेच महापालिकेशी देखिल संपर्क साधलेला नाही. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी देखिल अद्याप या कंपनीशी संपर्क साधलेला नाही. एरव्ही एक दिवसांची मुदत उलटली तरी ‘गतिमान’ आणि ‘स्वच्छ’ कारभार दाखविणार्‍या पालिका प्रशासनाने आठवडा उलटल्यानंतरही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे प्रशासक आणि महापालिका प्रशासन (PMC Administration) कुठल्यातरी दबावाखाली ‘वारजे हॉस्पीटल’चा प्रकल्प पुणेकरांवर लादत असल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

 

वारजे हॉस्पीटलसाठी ज्या कंपनीची निविदा मान्य झाली आहे, त्यांना लेटर ऑफ इंटेट देण्यासाठीची मुदत संपली आहे.
पुढील निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक घेतील.

– रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (IAS Ravindra Binwade, Additional Municipal Commissioner)

Web Title : Pune PMC Warje Multispeciality Hospital | Even after the deadline,
the contractor company did not give letter of intent, attention to the decision of the Pune municipal administrators

The post Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल : मुदत उलटल्यानंतरही ठेकेदार कंपनीने लेटर ऑफ इंटेट दिले नाही, महापालिका प्रशासकांच्या निर्णयाकडे लक्ष appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article