Header

Pune Police News | पणयतल 11 महल पलसच वरषठ नरकषकवरधद पलस आयकतकड तकरर; मठय अडचणन व मनसक तरसल तड दत

Pune Police News | पणयतल 11 महल पलसच वरषठ नरकषकवरधद पलस आयकतकड तकरर; मठय अडचणन व मनसक तरसल तड दत

Pune Police News | Complaint of 11 women cops in Pune to police commissioner against senior inspector; Facing great difficulties and mental distress…

नितीन पाटील

पुणे : Pune Police News | पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) एका पोलिस ठाण्यातील तब्बल 11 महिलांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरूध्द (Senior Police Inspector) पोलिस आयुक्तांकडे दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता. दरम्यान, अर्जात महिला पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस स्टेशनच्या डीओंविरूध्द गंभीर आरोपी केले आहेत. अर्जाची वरिष्ठ पातळीवर चौकशी देखील झालेली आहे. त्या चौकशीमध्ये 6 महिला पोलिस कर्मचार्‍यांनी सदरील अर्जाशी आमचा काही एक संबंध नसल्याचे सांगुन अर्जावरील सह्या देखील आमच्या नसल्याचे सांगितले आहे तर अर्ज करणार्‍यांपैकी 4 महिला पोलिस कर्मचार्‍यांचा डिफाल्ट रिपोर्ट पोलिस स्टशेनकडून यापुर्वीच संबंधित वरिष्ठांना पाठविला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चौकशीत केलेल्या आरोपांमध्ये काही एक तथ्य आढळले नसले तरी पाणी कुठं तरी मुरत असल्याचं जाणवतंय. (Pune Police News)

‘त्या’ पोलिस स्टेशनमध्ये जवळपास 37 महिला कर्तव्यास आहेत. त्यापैकी 11 महिला कर्मचार्‍यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि डीओंच्याविरूध्द गंभीर आरोप केले आहेत. हा तक्रार अर्ज दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आला होता. त्याची वरिष्ठांकडून चौकशी देखील झालेली आहे. चौकशीत केलेल्या आरोपांमध्ये काही एक तथ्य नसल्याचं सांगितलं जातंय. मात्र, महिला पोलिसांनी केलेले आरोप हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्या 6 महिलांनी या अर्जाशी आमचा काही एक संबंध नाही, अर्जावर असलेल्या सह्या आमच्या नाहीत असं सांगितलं असं समोर आल्यानंतर त्या 6 महिला पोलिस दबावाखाली येवुन असं बोलताहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. (Pune Police News)

तक्रारी अर्जात प्रामुख्याने, वेळावेळी बंदोबस्त लावला जातो, बंदोबस्तावर असताना देखील हजेरी बंधनकारक केली जाते, सकाळची हजेरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक न घेता डीओ घेतात. डीओ वरिष्ठ पोलिस निरीक्षकासारखे वागतात. सिक पास दिला जात नाही, सिकमध्ये गेल्यावर आजारी असताना देखील सिक पास दिला जात नाही. जी व्यक्ती सिक मध्ये गेली आहे, तिच्या घरी कोणालातरी पाठवुन ती आजारी आहे का याबाबतचा फालोअप घेतला जातो. त्याचे घराचे फोटो काढुन आणाले जातात. पोलिस उपायुक्तांकडून अर्जित रजा मंजुर असताना देखील रजा दिली जात नाही. पासपोर्ट टेबलवर असणार्‍यांना कुठलाही बंदोबस्त दिला जात नाही. अशा बर्‍याच प्रकाराचा उल्लेख तक्रार अर्जात प्रामुख्याने आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या प्रकरणाबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की,
‘त्या’ पोलिस स्टेशनमध्ये महिलांची संख्या खुपच जास्त आहे. तिथं 37 महिला पोलिस कर्मचारी कर्तव्यास आहेत.
अलिकडील काळामध्ये बंदोबस्ताचे प्रमाण वाढले आहे.
पोलिस स्टेशन चालवताना थोडं पुढं-मागं होतं मात्र अर्जात केलेले आरोप हे पुर्णपणे तथ्यहीन आहेत.

महिला पोलिस कर्मचार्‍यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि डीओंविरूध्द
थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title : Pune Police News | Complaint of 11 women cops in Pune to police commissioner
against senior inspector; Facing great difficulties and mental distress…

The post Pune Police News | पुण्यातील 11 महिला पोलिसांची वरिष्ठ निरीक्षकाविरूध्द पोलिस आयुक्तांकडे तक्रार; मोठ्या अडचणींना व मानसिक त्रासाला तोंड देत… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article