Pune Police News | पण : बधकम ठकदरस वठस धरणर 2 पलस तडकफडक नलबत जणन घय परकरण

पुणे (नितीन पाटील) – Pune Police News | पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षास (Pune Police Control Room) दुसर्याच्या मोबाईलवरून कॉल करून खोटी माहिती (Fake Call) देवुन बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणार्या 2 पोलिस अंमलदारांना पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill) यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. (Pune Police News)
पोलिस अंमलदार निखिल राजेंद्र शेडगे (Police Nikhil Rajendra Shedge) आणि पोलिस अंमलदार आकीब सत्तार शेख (Police Aqib Sattar Shaikh) अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये (Deccan Police Station) कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 12 मे 2023 च्या रात्री 9 ते दि. 13 मे 2023 च्या सकाळी 9 वाजेपर्यंत दोघांची नेमणुक प्रभात पोलिस चौकीच्या (Prabhat Police Chowki) हद्दीत बीट मार्शल म्हणून होती. (Pune Police News)
निखिल शेडगे आणि आकीब शेख यांनी एका हॉटेलमध्ये जावुन तेथील कामगाराचा फोन घेवुन नियंत्रण कक्षास कॉल करून प्रभात चौकीच्या हद्दीत रात्रीच्यावेळी रोड रिपेरिंगचे काम सुरू असून त्याचा त्रास होत असल्याचे सांगितले. कंट्रोलने सदरील माहिती बीट मार्शल शेडगे आणि शेख यांना दिल्यानंतर ते दोघे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी तेथील ठेकेदारास आम्हास कंट्रोलचा कॉल आला असुन, तुमची कामाची वर्क ऑर्डर व रात्री काम करण्याची परवानगी दाखवा नाहीतर काम बंद करा असे सांगितले. दोघांनी तक्रार अर्जदाराचे काही न ऐकता त्यांना पोलिस स्टेशनला नेले होते. (Two Beat Marshals Suspended In Pune)
ठेकेदाराने त्यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रार केली. तक्रारीच्या चौकशी दरम्यान पोलिस अंमलदार शेडगे आणि शेख यांनी दुसर्याचा मोबाईल वापरून कंट्रोलला कॉल करून विनाकारण ठेकेदारास त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांनी दोघांना निलंबीत केले आहे. (Two Pune Cops Suspended)
Web Title : Pune Police News | Two policemen who harassed a construction contractor have been suspended, know the case
- Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले; ससून रुग्णालयाच्या गेटसमोरील घटना
- ACB Trap News | सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा वेल्हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात
The post Pune Police News | पुणे : बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.