Header

Chhagan Bhujbal | सहबन मल बलवल तर मपण छगन भजबळच मठ वधन

Chhagan Bhujbal | सहबन मल बलवल तर मपण छगन भजबळच मठ वधन

Chhagan Bhujbal | if sharad pawar invite me for meeting i will meet him said chhagan bhujbal

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला आहे. अशातच शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना बघायला मिळत आहे. अशातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार यांना आमदार (NCP MLA) भेटण्यासाठी जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार सोडले तर सगळे आमदार आमच्याच बाजूने आहेत, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले, दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवार यांना किती पाठिंबा मिळत आहे ते तुम्ही बघू शकता, असेही ते म्हणाले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की आमदार सिल्वर ओकवर जात आहेत. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन. मला बोलावलं तर मीपण जाईन, असं भूजबळ यांनी सांगितलं.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भुजबळ यांनी म्हटलं होतं की शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत. भुजबळ यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. यावेळी त्यांना अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर भुजबळ यांनी बाकी सगळ्या गोष्टी स्टेजवर बोलू असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आमच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बैठका मुंबईत होत आहेत. आज सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) बंगल्यावर कार्यकर्ते जमत आहेत.

Web Title : Chhagan Bhujbal | if sharad pawar invite me for meeting i will meet him said chhagan bhujbal

The post Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article