Pankaja Munde Dhananjay Munde Reunite | मड बहण-भवत दलजमई पकजकडन धनभऊच चदचय तटतन औकषण (वहडओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Pankaja Munde Dhananjay Munde Reunite | राज्यात पवार विरुद्ध पवार असे राजकारण (Maharashtra NCP Political Crisis) सुरु असताना दुसरीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात दिलजमाई झाल्याचे पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ देत राज्य सरकारमध्ये (State Government) मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता सोशल मीडियावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजकीय मैदानात बहिण-भावामध्ये शाब्दीक लढा आणि वैचारीक लढा जरी पाहायला मिळत असला तरी आता पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचे औक्षण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Pankaja Munde Dhananjay Munde Reunite)
https://twitter.com/dhananjay_munde/status/1677182595787010048?s=20
पंकजा मुंडे यांनी औक्षण करतानाचा व्हिडिओ स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. राज्याच्या मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव (BJP National Secretary) पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मी ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दु:खाचा सागर, बहिण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, असं लिहित वर्षानुवर्षांच्या वादावर मुंडे भावंडांनी पडदा टाकल्याचे चित्र आहे. (Pankaja Munde Dhananjay Munde Reunite)
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (दि.6) पंकजा मुंडे यांच्या वरळीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याचा एक व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचं औक्षण करताना दिसत आहेत. यावेळी त्या चांदीच्या ताटात दिवा ठेवून भावाची ओवाळणी करताना दिसत आहे. तसेच त्यांनी एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केलं. यावेळी त्या दोघांनी एकमेकांशी गळाभेटही घेतली.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1677182640984834048?s=20
दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Congress Leader Sonia Gandhi) यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली या मुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अखेर आज पत्रकार परिषद घेणार असल्याचं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेत त्या एखादी मोठी घोषणा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title : Pankaja Munde Dhananjay Munde Reunite | bjp-pankaja-munde-congratulated-cousin-brother-ncp-minister-dhananjay-munde
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Ganeshotsav 2023 | गणेशमंडळांना मोठा दिलासा! चार फुटांवरील पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी
- Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी
The post Pankaja Munde Dhananjay Munde Reunite | मुंडे बहिण-भावात दिलजमाई, पंकजांकडून धनूभाऊचं चांदीच्या ताटातून औक्षण (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.