Header

Pune Accident News | धककदयक! रगणवहकनच घतल एकच जव गड मग घतन जयषठ नगरकल दनद चरडल; जननर तलकयतल घटन (वहडओ)

Pune Accident News | धककदयक! रगणवहकनच घतल एकच जव गड मग घतन जयषठ नगरकल दनद चरडल; जननर तलकयतल घटन (वहडओ)

Pune Accident News | junnar ambulance crushes person to death in runs over body twice shocking cctv footage

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Accident News | रुग्णवाहिका (Ambulance) मागे घेत असताना चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला (Elderly Person) चिरडल्याची (Pune Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला असून या घटनचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना (Pune Accident News) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानक परिसरात डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर घडली. अपघातानंतर वृद्धाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रज्जाक मुंढे (Razzak Mundhe) असे मृत्यू (Death) झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) ओतूर येथील बस स्थानकात प्रवासी वृद्ध उभा होता. त्यावेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर येत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभा असलेल्या प्रवाशाला एकदा चिरडलं. मात्र हा प्रकार त्याच्या लक्षात न आल्याने गाडी मागे घेताना पुन्हा चिरडलं. (Pune Accident News)

अपघातानंतर रुग्णवाहिकेतील लोकांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेले. जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

रस्त्यावर उभा असलेला व्यक्ती रुग्णवाहिका चालकाला दिसली नाही का? किंवा त्याने गाडी मागे घेताना कुठलीही काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरुन दिसून येते. मात्र, यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. पोलिसांकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

Web Title : Pune Accident News | junnar ambulance crushes person to death in runs over body twice shocking cctv footage

The post Pune Accident News | धक्कादायक! रुग्णवाहिकेनेच घेतला एकाचा जीव, गाडी मागे घेताना ज्येष्ठ नागरिकाला दोनदा चिरडलं; जुन्नर तालुक्यातील घटना (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article