Header

Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून हडपसर परिसरातील फुरसुंगी येथून तब्बल 60 लाखांचे 3 किलो अफीम जप्त

Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून हडपसर परिसरातील फुरसुंगी येथून तब्बल 60 लाखांचे 3 किलो अफीम जप्त

Pune Crime News | anti narcotics squad 2 of pune crime branch seized 3 kg of opium worth around 60 lakhs from fursungi in hadapsar area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अफिम (Opium) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 60 लाख रुपये किमतीचे 3 किलो 29 ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मोहनलाल मेगाराम बिश्नोई Mohanlal Megaram Bishnoi (वय-24 रा. बगरापूर मारवाडी, तहसील बुडामालाने, जि. बाडनेर राज्य राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.28) हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील गंगानगर फुरसुंगी येथील बदरके यांच्या गोडाऊनजवळ केली. (Pune Crime News)

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narke), दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan) आणि पोलिस अंमलदार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे (Yogesh Mandhare) यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंगानगर येथील बदरके यांच्या गोडाऊनजवळील सार्वजनिक रोडवर एकजण अफिम हा अंमली पदार्थ विक्री करण्यासठी येणार आहे. पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून आरोपील बिश्नोई याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेऊन 60 लाख रुपये किंमतीचे 3 किलो 29 ग्रॅम अफिम आणि 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte),
पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी,
संतोष देशपांडे, संदीप जाधव, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदीप शेळके, रवी रोकडे यांच्या पथकाने केली.

Web Title :  Pune Crime News | anti narcotics squad 2 of pune crime branch seized 3 kg of opium worth around 60 lakhs from fursungi in hadapsar area

The post Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून हडपसर परिसरातील फुरसुंगी येथून तब्बल 60 लाखांचे 3 किलो अफीम जप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article