Pune Crime News | पुणे-सातारा रोडवर दारु पिताना झालेल्या वादात पोटात चाकू खूपसून खूनाचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | आखाडातील (Akhad Party) शेवटच्या दिवशी दारु पिण्यासाठी आलेल्यांमध्ये वाद झाल्याने त्यातून एकाने दुसर्याच्या पोटात चाकू खूपसून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत समीर हुसैन काझी (वय ३२, रा. शिवदर्शन, पर्वती – Shivdarshan Parvati) हे गंभीर जखमी झाले असून सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) निसार शेख (वय ५६, रा. अरण्येश्वर, सहकारनगर) याला अटक केली आहे. हा प्रकार पुणे सातारा रोडवरील लोकेश हॉटेलजवळील देशी दारुचे दुकानात सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारु पिण्यासाठी देशी दारुच्या दुकानात गेले होते. तेथे त्यांच्या तोड ओळखीचा निसार शेख हाही आला होता. तो फिर्यादीस विनाकारण शिवीगाळ करु लागला. समीर त्याला समजावून सांगत होता. तरीही तो ऐकत नव्हता. त्यामुळे चिडलेल्या समीर याने त्याच्या तोंडात मारली. त्याचा राग येऊन निसार याने त्याच्याजवळील चाकू काढून समीर याच्या पोटात खूपसला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन निसार शेख याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप (PSI Jagtap) तपास करीत आहेत.
Web Title : pune crime news attempted murder by stabbing a knife in the stomach during a drunken argument on the pune satara road
हे देखील वाचा
- Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक
- Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)
- Ashish Sakharkar Passes Away | मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचे निधन
- Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण
The post Pune Crime News | पुणे-सातारा रोडवर दारु पिताना झालेल्या वादात पोटात चाकू खूपसून खूनाचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.