Header

Pune Crime News | खासगी सावकाराच्या कृत्याने पुणे हदरले ! पतीसमोरच महिलेवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime News | खासगी सावकाराच्या कृत्याने पुणे हदरले ! पतीसमोरच महिलेवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime News | pune was shaken by the actions of a private moneylender rape of a woman in front of her husband incidents in hadapsar area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत न केल्याने खासगी सावकाराने (Money Lenders) पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या पत्नीवर बलात्कार (Rape In Pune) केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. त्यानंतर तिने नकार दिल्यावर हे चित्रिकरण सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हडपसर पोलिसांनी इम्तियाज हशीम शेख Imtiaz Hashim Shaikh (वय ४७, रा. सुरक्षानगर, म्हाडा कॉलनी, हडपसर – Mhada Colony Hadapsar) याला अटक केली आहे.

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०८६/२३) दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२३ मध्ये घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने इम्तियाज शेख याच्याकडून उसने पैसे घेतले होते.
हे पेसे फिर्यादीचा पती परत देऊ शकला नाही.
त्यामुळे शेख याने फेब्रुवारीमध्ये फिर्यादी व त्यांच्या पतीने जीवे मारण्याची धमकी (Threats To Kill) दिली.
त्याने सुरक्षानगरमधील म्हाडा कॉलनीत बोलावले.
तेथे पतीस समोर बसवून चाकूचा धाक दाखविला. जीवे मारण्याची धमकी दिली.
जबरदस्तीने फिर्यादीवर बलात्कार (Pune Rape Case) केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले.
या घटनेनंतर तो फिर्यादीला वारंवार बोलवायला लागला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.
तेव्हा त्याने तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला.
हे समजल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी इम्तियाज शेख याला अटक केली असून
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | pune was shaken by the actions of a private moneylender rape of a woman in front of her husband incidents in hadapsar area

The post Pune Crime News | खासगी सावकाराच्या कृत्याने पुणे हदरले ! पतीसमोरच महिलेवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article