Header

Pune Crime News | फर्ग्युसन कॉलेजमधील बीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

Pune Crime News | फर्ग्युसन कॉलेजमधील बीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

Pune Crime News | b sc student commits suicide by hanging himself in fergusson college

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेने पुणे शहरात (Pune Crime News) खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. ओम निलेश कापडणे (Om Nilesh Kadane) (वय 20) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station ) नोंद करण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

समोर आलेल्या माहितीनुसार, वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती समजताच ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केले. (Pune Crime News)

दरम्यान, ओम मुळचा नाशिक (Nashik) येथील असल्याची माहिती आहे. तो पुण्यातील विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता.
तो फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ओमने जिथे गळफास घेतला तिथे घटनास्थळी कोणतेही पत्र आढळून आलेले नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण समोर आले नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) यांनी सांगितले.

Web Title : Pune Crime News | b sc student commits suicide by hanging himself in fergusson college

हे देखील वाचा

 

The post Pune Crime News | फर्ग्युसन कॉलेजमधील बीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article