Pune Crime News | बोलणे तोडल्याने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | बोलणे बंद केल्याने शिवीगाळ करुन तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा प्रकार हडपसरमध्ये घडला. तरुणीने आरडाओरडा करुन स्वत:चा जीव वाचविला असून हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजिम आयुब मुलाणी Azim Ayub Mulani (वय २३, रा. वडकी, सासवड रोड – Wadki Saswad Road) असे या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी वडकी येथे राहणार्या एका १९ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. १०८१/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील रविदर्शन (Ravidarshan Hadapsar) येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून एकमेकांसोबत बोलत होते.
काही कारणामुळे फिर्यादीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
त्यामुळे आजिम मुलाणी हा वेगवेगळ्या मोबाईल फोनवरुन फिर्यादीचे आईला व भावाला विनाकारण मिस कॉल द्यायचा.
फिर्यादी या त्यांच्या मामेभावाबरोबर मोटारसायकलवरुन जात असताना आजिम हा कारमधून आला.
त्याने फिर्यादीच्या मामेभावाचा हात धरुन त्याला शिवीगाळ केली.
फिर्यादीचे हाताला झटका देऊन त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. अमनोरा मॉल येथे नेले.
तेथे फिर्यादीला शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून गळा आवळला.
त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा करुन स्वत:चा जीव वाचविला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक जगताप (Assistant Police Inspector Jagtap)
तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | an attempt to strangle a young woman for breaking the
conversation incidents in hadapsar
हे देखील वाचा
- EPFO Interest Rate | कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! PF वरील व्याज दर वाढवला
- Pune Crime News | स्वारगेट चौकात व्यावसायिकावर फायरिंग करणार्या मुख्य आरोपींना क्राईम ब्रँचकडून अटक ! 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे अन् साडेतीन लाखाची रोकड जप्त (Video)
The post Pune Crime News | बोलणे तोडल्याने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटना appeared first on बहुजननामा.