Header

Pune Crime News | टमटच भव वचरल अन पढ झल अस क

Pune Crime News | टमटच भव वचरल अन पढ झल अस क

Pune Crime News | He asked the price of tomatoes, and it happened

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. त्यामुळे गृहिणीच काय हॉटेल मालक इतकेच काय अगदी मॅकडोनाल्ड सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांही जेरीस आल्या आहेत. या टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात जोरदार हाणामारी वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये (Wadgaon Sheri Bhaji Mandai) झाली. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२२/२३) दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये ५ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाल ढेपे हे भाजी आणण्यासाठी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांना टोमॅटोचा भाव विचारला. त्यांनी टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना खूप महाग आहेत, असे उत्तर दिले. त्यावरुन अनिल गायकवाड याने ढेपे यांना शिवीगाळ केली. त्यांच्या तोंडावर बुक्कीने मारहाण (Beating) करुन वजनकाट्यातील वजन हातात घेऊन त्यांच्या उजव्या गालावर मारुन जखमी केले. पोलीस हवालदार नांगरे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | He asked the price of tomatoes, and it happened

The post Pune Crime News | टोमॅटोचा भाव विचारला, अन् पुढे झाले असे की appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article