Header

API Murder News | धक्कादायक! धारदार शस्त्राने वार करुन API चा निघृण खून

API Murder News | धक्कादायक! धारदार शस्त्राने वार करुन API चा निघृण खून

API Murder News | brutal murder of Assistant Inspector of Police major incident in sangola taluka Maharashtra Police News

सांगोला : बहुजननामा ऑनलाइन – API Murder News | अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून येऊन धारदार शस्त्राने सपासप वार करुन सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा निर्घृण खून (API Murder News) केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. ही घटना (Solapur Crime News) बुधवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास वासुद येथील केदारवाडी रोडवर घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे API Suraj Vishnu Chandanshive (वय-42 रा. वासूद ता. सांगोला) असे खून झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर सूरज हे आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर (Kedarwadi Road) ते शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सूरज यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Sharp Weapon Attack) केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

शतपावली करुन बराचवेळ झाला तरी सूरज घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला.
त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला.
कुटुंबीयांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी (PI Anant Kulkarni) पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
सूरज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात (Sangola Rural Hospital) पाठवून दिला.
याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : API Murder News | brutal murder of Assistant Inspector of Police major incident in sangola taluka Maharashtra Police News

हे देखील वाचा

The post API Murder News | धक्कादायक! धारदार शस्त्राने वार करुन API चा निघृण खून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article