Header

PM Modi Visit Pune | माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट!

PM Modi Visit Pune | माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट!

PM Modi Visit Pune | former mla arvind leles family met prime minister narendra modi

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – PM Modi Visit Pune | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आणि आमच्या सर्व कुटुंबाची एकत्रित भेट झाली. माझे वडील कै. डॉक्टर अरविंद लेले (Dr Arvind Lele) यांचा चरित्र ग्रंथ “कृतार्थ” आज त्यांना (PM Modi Visit Pune) सस्नेह सादर केला. तसेच तळजाई शिबिरामध्ये कै. बाबूजींनी गायलेल्या आणि माझ्या वडिलांनी लिहिलेल्या हिंदू सारा एक या गीताची एक सुंदर फ्रेम करून त्यांना भेट दिली. पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) या प्रधानमंत्री कोशामध्ये आम्हा सर्व कुटुंबीयांतर्फे दोन लाख रुपये समर्पण केले असे मिलिंद लेले यांनी सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भारताच्या भविष्याची दिशा बदलणारे आणि हिंदू संस्कृतीला जगात मानाचे स्थान पुन्हा मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या जुन्या स्नेहाची आठवण ठेवून आम्हा सर्व कुटुंबीयांना त्यांनी आज भेटीचे वेळ दिले. त्यांच्यासारख्या अत्यंत तेजस्वी व्यक्तीला भेटून आज आम्हाला कृतकृत्य झाल्याचा अनुभव येतो आहे.

आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची त्यांनी वैयक्तिक चौकशी देखील केली. “पक्षाचे काम करताना पूर्ण समर्पण भावनेने कर. आपल्या विचारांपासून आणि तत्वांपासून फारकत घेऊ नकोस. सामाजिक कार्य करताना अंत्योदय हेच आपले ध्येय असले पाहिजे” असे त्यांनी आवर्जून सांगितले. आजचा दिवस आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरला. यावेळी अनुराधा लेले, मिलिंद लेले, प्रमोद लेले, हेमंत लेले, सुवर्ण लेले, अंजली लेले हे उपस्थित होते.

Web Title :  PM Modi Visit Pune | former mla arvind leles family met prime minister narendra modi

हे देखील वाचा

 

The post PM Modi Visit Pune | माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article