Header

Pune Accident News | बीआरटीमध्ये बसची समोरासमोर धडक; नगर रोडवरील अपघातात चालकासह २९ जण जखमी

Pune Accident News | बीआरटीमध्ये बसची समोरासमोर धडक; नगर रोडवरील अपघातात चालकासह २९ जण जखमी

Pune Accident News | bus collides head on in brt 29 people including the driver injured in an accident on nagar road

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे -नगर रोडवर (Pune-Nagar Road) बीआरटीमध्ये (BRT) दोन बस समोरासमोर एकमेकांना धडकल्या असून त्यात चालकासह २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. (Pune Accident News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

नगर रोडवरील बीआरटी मार्गात दोन बस समोरासमोरुन येत होत्या. तळेगाव ढमढेरे ते मनपा (Talegaon Dhamdhere to PMC) ही बस पुण्याकडे येत होती. तर दुसरी बस वाघोलीच्या दिशेने जात होती. यावेळी वाघोलीकडे जाणारी बस वेगात येऊन समोरुन येणार्‍या सीएनजी बसला धडकली. त्यात बसचालक, कंडक्टर यांच्यासह २९ जण जखमी झाले.

अपघातात जखमींना हाताला, तोंडाला, पायाला मार लागला आहे. जखमींमध्ये ८ महिला असून १७ प्रवासी, दोन्ही बसचे चालक, दोन्ही वाहक यांचा समावेश आहे. (Pune Accident News)

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
रुग्णवाहिकेतून व मिळेल त्या वाहनांमधून जखमींना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेण्यात आले.
सर्वांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कोणीही गंभीर जखमी नाही.

Web Title :  Pune Accident News | bus collides head on in brt 29 people including the driver injured in an accident on nagar road

हे देखील वाचा

 

The post Pune Accident News | बीआरटीमध्ये बसची समोरासमोर धडक; नगर रोडवरील अपघातात चालकासह २९ जण जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article