Header

Pune Crime News | पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जाणार्‍या PMP बसचालकावर गुन्हा

Pune Crime News | पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जाणार्‍या PMP बसचालकावर गुन्हा

Pune Crime News | Case Registered Against PMP Bus Driver Who Ran Over Police Sub-Inspector 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-सातारा रोडवरील (Pune Satara Road) मार्केटयार्ड चौकात (Market Yard Chowk) वाहतूक कोंडी (Traffic Jam In Pune) झाली असताना बस पुढे घेण्यास नकार देऊन पोलिसांशी हुज्जत घालून पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जाणार्‍या पीएमपी बसचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

निळकंठ शरनाप्पा दिक्षीवंत (वय ३८, रा. संतोषनगर, कात्रज – Santosh Nagar Katraj) असे या पीएमपी चालकाचे नाव आहे. हा प्रकार सातारा रोडवरील मार्केटयार्ड चौकात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत महिला पोलीस हवालदारांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४०/२३) दिली आहे. फिर्यादी या मार्केटयार्ड चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होत्या. त्यांनी पीएमपी बस पुढे घेण्यास सांगितले.
तेव्हा चालकाने बस पुढे घेण्यास नकार देऊन फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरली.
हे पाहून तेथे असणारे पोलीस उपनिरीक्षक खेंगरे यांनी चालकाला खाली उतरण्यास सांगितले.
तेव्हा बसचालक बसमधून खाली उतरुन फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन तुम्हाला बघुन घेतो, अशी धमकी दिली,
असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Case Registered Against PMP Bus Driver Who Ran Over Police Sub-Inspector 

 

The post Pune Crime News | पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जाणार्‍या PMP बसचालकावर गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article