Header

Pune Crime News | येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | a prisoner attempted suicide by stabbing himself with a blade in yerawada jail 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेचा खून (Murder Case) केल्याने जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence) भोगत असलेल्या कैद्याने स्वत:च्या हातावर खराब ब्लेडने मारुन गंभीर जखमी करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

धनंजय राजाराम दिघे Dhananjaya Rajaram Dighe (मुळ रा. गुरुवार पेठ, पुणे) असे या कैद्याचे नाव आहे.

येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) खुल्या कारागृहातील मुद्रणालय येथील आतील परिसरात असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

धनंजय दिघे याने रेखा जितेंद्र भंडारी या महिलेचा खून ५ एप्रिल २०१४ मध्ये केला होता. ऐकमेका समोर दोघांची झेरॉक्सची दुकाने होती. त्या वादातून त्याने रेखाचा खून (Pune Murder Case) केला होता. त्याला जुलै २०१९ मध्ये जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून तो शिक्षा भोगत आहे.

त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुला कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसात त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती.
त्याने मंगळवारी सकाळी पाण्याच्या हौदासमोर पडलेल्या खराब ब्लेडने स्वत:चे डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उप निरीक्षक लिंगे (PSI Linge) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | a prisoner attempted suicide by stabbing himself with a blade in yerawada jail

हे देखील वाचा

The post Pune Crime News | येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article