Pune Crime News | वादातून एजंटांची प्रवाशांना मारहाण; तिघा एजंटावर गुन्हा दाखल, वाकडेवाडी एस टी स्टँडवरील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | जळगाव येथे जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांशी पैशांवरुन झालेल्या वादात एजंटांनी (Agent) तरुणाला, त्याच्या भावाला व आजोबांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत कुणाल रामभाऊ गवळी (वय १९, रा. जळगाव) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शाहरुख जमाल शेख Shah Rukh Jamal Shaikh (वय २८, रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी), सर्फराज अल्ताफ सय्यद Sarfraz Altaf Syed (वय ३२, रा. ग्रीन पार्क सोसायटी, कोंढवा) आणि मल्लेश प्रकाश गाडीवाला Mallesh Prakash Gadiwala (वय ३३, रा. शिवाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
फिर्यादी हे त्यांचा भाऊ व आजोबा यांच्यासह जळगावला जाण्यासाठी गुरुवारी दुपारी चार वाजता वाकडेवाडी येथील
एस टी स्टँडसमोर आले होते. त्यांना लवकर जायचे असल्याने गाडीचे तिकीटाबाबत एका एजंटाबरोबर चर्चा करीत होते.
पैसे कमी जास्त करताना तो एजंट व इतरांबरोबर वाद झाला. त्या वादातून तिघा एजंटांनी त्या तिघांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक मगदुम (PSI Magadum) तपास करीत आहेत.
- Pune Crime News | मैत्रिणीनेच घरातील दागिने नेले चोरुन; चेक देऊन केला बाऊन्स
- Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/ उप अधीक्षक पदावर पदोन्नती
- ACB Trap News | अडीच हजार रुपये लाच घेताना ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
The post Pune Crime News | वादातून एजंटांची प्रवाशांना मारहाण; तिघा एजंटावर गुन्हा दाखल, वाकडेवाडी एस टी स्टँडवरील घटना appeared first on बहुजननामा.