Pune Crime News | कर्नलचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस चोरट्यांनी लांबविले

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकी येथील आर्मीच्या बेस वर्कशॉपमधून (Army Base Workshop Khadki) एका कर्नलचे (Colonel) पिस्तुल (Pistol) आणि तब्बल २० जिवंत काडतुसे चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत कर्नल समीर गर्ग (वय ५८,रा. आर्मड कोर्प सेंटर अँड र्स्कुल अहमदनगर) यांनी खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९३/२३) दिली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी सांगितले की, समीर गर्ग हे कर्नल असून त्यांची पूर्वी आर्मी बेस वर्कशॉपमध्ये नियुक्ती होती.
त्यावेळी त्यांना येथे एक खोली देण्यात आली होती. त्यांनी आपले साहित्य व लोखंडी पेटी ठेवली होती.
त्यानंतर सध्या यांची अहमदनगर येथे बदली झाली. ते अधूनमधून पुण्यात येत असतात.
२१ मार्च ते १२ ऑगस्ट दरम्यान चोरट्याने आर्मी बेस वर्कशॉपचे खिडकी तोडून आत प्रवेश केला.
लोखंडी पेटीची कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेले. नुकतेच ते पुण्यात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक मगदुम (PSI Magadum) तपास करीत आहेत.
- वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्तीचा झाला गोळा, लॉकर मात्र वाचले व्हिडिओ
- मुंढवा पोलीस ठाण्यात अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा, रिक्षाचालकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव
- पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील युवकाचे देदीप्यमान यश ! डॉ. अनिकेत जगताप यांनी मिळवली प्रथम श्रेणीत एम.डी. मेडिसिन पदवी
- शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित
- टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये होणार बंपर नोकरभरती; तरुणांना काम करण्याची सुवर्णसंधी
The post Pune Crime News | कर्नलचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस चोरट्यांनी लांबविले appeared first on बहुजननामा.