Pune Crime News | कोयत्याचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटणार्या गुंडाला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कोयत्याचा (Koyta) धाक दाखवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून (Zomato Delivery Boy) जबरदस्तीने लिफ्ट घेऊन त्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्या गुंडाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हर्षद राजेंद्र देशमुख Harshad Rajendra Deshmukh (वय २७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
याबाबत यश नथु कदम (वय २२, रा. आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२३) दिली आहे. हा प्रकार बालाजीनगर येथील सागर लॉज (Sagar Lodge Balajinagar) ते चव्हाणनगरमधील शनि मंदिर दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. सागर लॉजमध्ये ते बुधवारी रात्री पार्सल देऊन परत आले. मोटारसायकलवरुन जात असताना हर्षद देशमुख हा अचानक त्यांच्या मोटारसायकलवर बसला. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून माझे नाव हर्षद देशमुख आहे. मी इथला भाई आहे.
तू जर मला चव्हाणनगर येथे नेऊन सोडले नाही तर तुला मारुन टाकेन, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यांना मोटारसायकल चव्हाणनगरमधील शनि मंदिराजवळ घेण्यास भाग पाडले. तेथे आल्यावर फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तेथे जमलेल्या लोकांच्या दिशेने हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी देशमुख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पोठारे (PSI Pothare) तपास करीत आहेत.
- Pune Crime News | पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 5 गुन्हेगार तडीपार
- SBI FD Scheme | SBI च्या अमृत कलश FD स्कीमची मुदत पुन्हा वाढली: गुंतवणूकदार घेऊ शकतात 7 टक्के व्याजदराचा फायदा
- Devrishi Narad Patrkar Samman | ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर
The post Pune Crime News | कोयत्याचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटणार्या गुंडाला अटक appeared first on बहुजननामा.