Header

Pune Crime News | रस्त्याने जाणार्‍या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले

Pune Crime News | रस्त्याने जाणार्‍या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले

Pune Crime News | A young man passing by was robbed by a Koyta; Three people, including two minors, were arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमधील काम संपवून घरी जात असलेल्या तरुणाला वाटेत अडवून कोयत्याचा (Koyta) धाक दाखवून लुबाडणार्‍या तिघांना पोलिसांनी (Pune Police) पकडले. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

ओंकार संजय कसाळकर Omkar Sanjay Kasalkar (वय २०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी रोड, विश्रांतवाडी) याला अटक केली असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत गाणाराम वेण्णाराम देवासी (वय ३१, रा. हॉटेल मस्त कलंदर, ताडीवाला रोड, मुळ रा. राजस्थान) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३६/२३) दिली आहे. हा प्रकार बंडगार्डन रोडवरील तनिष्क ज्वेलर्स समोर सोमवारी मध्यरात्री एक वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी हे नुकतेच राजस्थानातून पुण्यात आले असून
हॉटेल हिडन पॅलेसमध्ये (Hidden Palace Hotel) वेटर म्हणून काम करतात.
सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी ताडीवाला रोडला जात होते.
वाटेत तनिष्क ज्वेलर्ससमोरील रोडवर तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल व खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघा अल्पवयीनांसह तिघांना पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे (Assistant Police Inspector Lingade) तपास करीत आहेत.

 

The post Pune Crime News | रस्त्याने जाणार्‍या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article