Header

Pune Crime News | तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य

Pune Crime News | तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य

Pune Crime News | An attempt to kill a young man by stabbing him with an axe; Acts of two minors

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड तसेच कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

या घटनेत श्रीराम नरसराज मुप्पाला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रवि सिताराम राठोड (वय ३९, रा. लेबर कॅम्प, रामनगर, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा १७ व १८ वर्षाच्या मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाषाण सर्कल येथे रविवारी सकाळी सात वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र विलास हे भाजीपाला आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.
त्यावेळी पाषाण सर्कल येथे त्यांच्या ओळखीचा श्रीराम मुप्पाला याने त्यांना थांबविले. श्रीराम याने फिर्यादीकडे पैसे मागितले.
त्यावर त्याने भाजीपाला आणल्यानंतर एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगितले.

 

ते जाऊ लागले असतानाच दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी श्रीराम याच्यावर कुर्‍हाड, कोयत्याने सपासप वार करुन
तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो, असे म्हणू लागले. फिर्यादी हे त्यांच्याकडे पळत गेले.
त्यांना पाहून ते दोघे भगवतीनगरकडे पळून गेले. श्रीराम याच्यावर रुग्णालयात दाखल केले असून तो गंभीर जखमी आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव (PSI Bhalerao) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | An attempt to kill a young man by stabbing him with an axe; Acts of two minors

The post Pune Crime News | तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article