Header

Pune Crime News | ‘थेरगाव क्विननंतर आता हडपसरचा बादशाह!’, रिल्समधून थेट पोलिसांनाच देतोय आव्हान

Pune Crime News | ‘थेरगाव क्विननंतर आता हडपसरचा बादशाह!’, रिल्समधून थेट पोलिसांनाच देतोय आव्हान

Pune Crime News | after-thergaon-queen-now-the-badshah-of-hadapsar-challenging-the-pune-police-from-the-reals

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रियता मिळवण्याकरता कोण काय करेल याचा काही नेम नाही? काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडची ‘लेडी डॉन’, ‘थेरगाव क्वीन’ (Thergaon Queen) म्हणून ओळखली जाणारी तरूणी चर्चेत आली होती. रिल्समध्ये (Reels) अश्लील भाषा वापरल्यामुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली होती. (Pune Crime News) त्यानंतर आता पुण्यातील हडपसर (Hadapsar Badshah) मधील एका तरुणाने रिल्समधून थेट पुणे पोलिसांना (Pune Police) आव्हान दिलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची (Instagram Reels) खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर रील बनवून फेमस होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र यामुळे अनेकदा हातात घातक शस्त्रांचा वापर करुन रील बनवण्याचे प्रकारही वाढले आहेत. पुण्यात तरुणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदातीकरण करण्यात येत असून ही चिंतेची बाब बनली आहे. हडपसर मधील या तरुणाने सोशल मीडियावर एक रील्स बनला आहे. त्या रिल्समध्ये तरुण म्हणतो, ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते’. या तरुणाने बादशाह नावाचं रिल्स बनवून थेट पुणे पोलिसांचा आव्हान दिलं आहे. (Pune Crime News)

दरम्यान, पुणे शहरात कोयता गँगने (Koyta Gang) उच्छाद मांडला असताना मीडियाच्या
माध्यमातून रिल्स बनवून समाजामध्ये भीतीचे वातावरण तयार केले जात आहे.
दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार का,
याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रिल्सच्या माध्यमातून अनेक तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
करताना दिसून येत आहेत.

 

The post Pune Crime News | ‘थेरगाव क्विननंतर आता हडपसरचा बादशाह!’, रिल्समधून थेट पोलिसांनाच देतोय आव्हान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article