Pune Crime News | फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालपणीच्या मित्राकडून तरुणीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लहानपणापासून मित्र (Childhood Friendship) असलेल्या एकाने मैत्रीचा गैरफायदा घेतला. दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) केला. हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीत घडला (Pune Crime News) असून पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख Asif Rahim Shaikh (वय-26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) याच्यावर आयपीसी 376, 504, 506, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेल मध्ये व आरोपीच्या चंदननगर येथील भावाच्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि फिर्यादी हे बालपणाचे मित्र आहेत.
त्या दोघांनी एकमेकांसोबत काढलेले साधे फोटो व्हायरल (Photo Viral) करुन बदनामी करण्याची धमकी
आरोपीने तरुणीला दिली. तसेच तुझ्या मामाला ठार मारेल अशी धमकी देऊन तरुणीसोबत जबरदस्तीने
शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर
पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळुक (PSI Muluk) करीत आहेत.
- प्लॉट विक्रीमध्ये एकाची दोन कोटींची फसवणूक, दोघांवर FIR; येरवडा परिसरातील घटना
- दुचाकीला बुलेट घासल्याने भाईने तरुणावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न
- पुणे वाहतूक पोलिसांकडून चलनाच्या दंडातील सवलतीबाबतच्या माहितीसाठी ‘हेल्पडेस्क’
- पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त
- रुफटॉप हॉटेलला ‘बार’चा परवाना देताना महापालिकेचे ‘ना हरकत ’प्रमाणपत्र बंधनकारक करावे
The post Pune Crime News | फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालपणीच्या मित्राकडून तरुणीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.