Header

Pune News | पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील युवकाचे देदीप्यमान यश ! डॉ. अनिकेत जगताप यांनी मिळवली प्रथम श्रेणीत एम.डी. मेडिसिन पदवी

Pune News | पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील युवकाचे देदीप्यमान यश ! डॉ. अनिकेत जगताप यांनी मिळवली प्रथम श्रेणीत एम.डी. मेडिसिन पदवी

Pune News | Great success of the youth of Indapur taluka of Pune district! Dr. Aniket Jagtap obtained first class M.D. Degree in Medicine

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील एका लहान गावातील मुलाने दैदिप्यमान यश मिळवून गावासह तालुक्याचे नाव मोठं केलं आहे. इंदापुर तालुक्यातील कालठण नं. 1 येथील डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप (Dr. Aniket Bapusaheb Jagtap) यांनी दिल्ली येथील गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठात (Guru Gobind Singh Indraprastha University Delhi) एम.डी. मेडिसिन (MD Medicine) मध्ये प्रथम श्रेणी मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Pune News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

पीडीसी बँकेत कार्यरत असणारे बापूसाहेब जगताप आणि नेत्रप्रभा जगताप यांचे सुपुत्र डॉ. अनिकेत जगताप यांचे
प्राथमिक शिक्षण इंदापुर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल (Priyadarshini English Medium School Indapur)
येथे झाले. तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील बी.एच. चाटे ज्युनियर कॉलेजमध्ये
(B.H. Chate School & Junior College, Pune) झाले. यावेळी त्यांनी सी.ई.टी परीक्षा (CET Exam) देऊन मुंबई
येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज (Lokmanya Tilak Medical College) सायन हॉस्पिटल (Sion Hospital) येथे एम.बी.बी.एस (MBBS) साठी प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस शिक्षण पुर्ण केले. (Pune News)

 

पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी नीट, पी.जी परीक्षा देऊन दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदरगंज
हॉस्पिटल नवी दिल्ली (Vardhaman Mahaveer Medical College and Safdarjung Hospital New Delhi)
येथे एम.डी. मेडिसिन साठी प्रवेश घेतला.जून 2023 मध्ये डॉ. अनिकेत जगताप यांनी मास्टर डिग्री प्राप्त केली.
त्यांनी गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठातून एम.डी. मेडिसिन मध्ये प्रथम श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवला.

डॉ. अनिकेत जगताप यांच्या यशाचे इंदापूर आणि कालठण नं. 1 येथील जगताप कुटुंबिय,
ग्रामस्थ तसेच मित्र परिवाराने कौतुक करुन अभिनंदन केले.
अनिकेत जगताप यांनी एम.डी. मेडिसिन पदवी प्राप्त करीत जगताप कुटुंबियांचे नावलौकिक केल्याबद्दल विधीतज्ञ
भारत जगताप, अमित जगताप यांनी त्यांचे कौतुक केले. या यशाबद्दल बोलताना डॉ. अनिकेत जगताप म्हणाले,
माझ्या यशात माझे वडील बापूसाहेब जगताप, आई नेत्रप्रभा जगताप यांच्यासह संपूर्ण जगताप कुटुंबाचा मोठा वाटा आहे.

 

The post Pune News | पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील युवकाचे देदीप्यमान यश ! डॉ. अनिकेत जगताप यांनी मिळवली प्रथम श्रेणीत एम.डी. मेडिसिन पदवी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article