Header

3 Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण

3 Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण

Pune Police News

पुणे : बहुजननामा ऑनलाईन 3 Cops Suspended In Pune | रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam In pune) झालेली असताना देखील वाहतूक नियमानाचे काम सोडून तिघे एकत्र कारवाई करताना आढळून आले होते. गंभीर प्रकार म्हणजे त्या तिघांनी आपली नावाची प्लेट झाकून ठेवली होता. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar) यांनी डेक्कन वाहतूक विभागातील (Deccan Traffic Division) तीन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईमुळे वाहतूक शाखेत (Pune Traffic Police) खळबळ उडाली आहे. (3 Cops Suspended In Pune)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

जयशिंग यशवंत बोराणे (Jaishing Yashwant Borane) , जितेंद्र दत्तात्रय भागवत (Jitendra Dattatreya Bhagwat), गोरख मारुती शिंदे Gorakh Maruti Shinde (सर्व नेमणूक डेक्कन वाहतूक) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे आहेत (Three Police Havaldar Suspended In Pune) . पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर हे शनिवारी (दि.16) जंगली महाराज रस्त्यावर होते. त्यावेळी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. डेक्कन वाहतूक विभागाला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ठाणे अंमलदार पाटील यांनी याबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली होती. (3 Cops Suspended In Pune)

दरम्यान, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर हे लॉ कॉलेज रोडने भंडारकर रोडच्या दिशेने जात असताना संबंधीत
तीन पोलीस हवालदार वाहतूक नियमन सोडून एकत्र कारवाई करताना आढळून आले.
वाहतूक नियमन हे प्रथम कर्तव्य असताना हे तिघे एकत्र नेमप्लेट झाकून कारवाई करताना आढळून आले.
तर एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस उपायुक्त मगर यांची गाडी पाहताच ‘धूम’ ठोकली.
तिघांनी केलेले वर्तन हे बेशिस्त बेजबाबदारपणाचे असल्याचा ठपका ठेवत तिघांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.

The post 3 Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article