Header

Pune Crime News | दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News | दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

Murder And Suicide Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बाणेर येथे खळबळजनक घटना घडली आहे. दाजीचा खून (Murder Case) केल्यानंतर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) पुण्यातील बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी (Shri Samriddhi Society Banner) मधील फ्लॅट नं. 201 येथे घडला आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

धनंजय साडेकर (वय -38) असे खून (Pune Murder News) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हेमंत काजळे (वय-40) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

श्री समृद्धी सोसायटी बाणेर पुणे फ्लॅट नंबर 201 येथे हेमंत काजळे (वय 40) यांनी त्यांचा दाजी धनंजय साडेकर (वय 38) याचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide News) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हेमंत यांनी बहिनीस धनंजयचा खून केला असून स्वतः आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

The post Pune Crime News | दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article