Header

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ

Murder News

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एकाचा खून झाल्याचं समोर आलं आहे (Murder In Pune). त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Pune Crime News )

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

गोपाळ कैलास मंडवे असे खून झालेल्याचे नाव आहे. आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना (Sinhagad Road Police Station) मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Pune Crime News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोपाळ मंडवे यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला आहे.
खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत. घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Murder In Sinhagd Road Raikar Mala)

The post Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article