Header

Pune Crime News | पीएमपी बसमध्ये चढताना पाकिटमारी करणार्‍या महिलेला अटक; साथीदार गेला पळून

Pune Crime News | पीएमपी बसमध्ये चढताना पाकिटमारी करणार्‍या महिलेला अटक; साथीदार गेला पळून

Lonikand Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पीएमपी बसमध्ये (PMP Bus) चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी (Pickpocketing) करणार्‍या चोरट्याला पकडत असताना त्याने मारहाण (Beating) करुन पळून गेला. त्याच्या साथीदार महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

गोवरी हरिया स्लाट Gowri Hariya Slot (वय २०, रा. वाघोली) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भिमराव श्रावण वाघमारे (वय २७, रा. केसनंद ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७११/२३) दिली आहे. हा प्रकार केसनंद फाटा येथे रविवारी सकाळी ११ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी मनिषा व सासरे तुळशीराम घाटे हे वाघोली ते पुणे स्टेशन (Wagholi to Pune Station) या बसमध्ये चढत होते.
त्यावेळी एका चोरट्याने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशात हात घातल्याचे जाणवले. त्यांनी लगेच त्याचा हात पकडला.
त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या महिलेने व त्याने फिर्यादीस जोरात ठोसा मारला. तेव्हा फिर्यादीची पत्नी मध्ये पडली.
तिला झटका देऊन खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन दोघे तेथून पळून जात असताना फिर्यादीची
पत्नी व किरण अप्पासाहेब यांनी चोरट्यासोबत असलेल्या महिलेला पकडले. चोरटा पळून गेला.
लोणीकंद पोलिसांनी महिलेला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु (API Rajguru) तपास करीत आहेत.

The post Pune Crime News | पीएमपी बसमध्ये चढताना पाकिटमारी करणार्‍या महिलेला अटक; साथीदार गेला पळून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article