Pune Crime News | बिबवेवाडी: पार्सल घेताना धक्का लागल्यानंतर अल्पवयीन युवकांकडून तरूणावर खुनी हल्ला

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमधून पार्सल घेताना धक्का लागल्याने एका १६ वर्षाच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने तरुणावर कोयत्याने (Koyta) वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अझर आमीर हंमजा शेख (वय ३०, रा. अप्पर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८२/२३) दिली आहे. त्यानुसार कोंढव्यातील एक १६ वर्षाचा मुलगा व त्यांच्या दोन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील पासलकर चौकामील संगम हॉटेलसमोर (Sangam Hotel Bibwewadi) सोमवारी रात्री पावणेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सलमान खान हे कोंढवा येथून अप्पर बिबवेवाडी येथील घरी जात होते. यावेळी वाटेत संगम हॉटेल येथे ते पार्सल घेण्यासाठी थांबले होते.
तेथेच पार्सल घेण्यासाठी आरोपी मुलगा थांबला होता.
वाटेत थांबल्याने फिर्यादीचा धक्का लागला, या कारणावरुन त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण
(Beating) केली. त्याच्या इतर दोन साथीदारांनी फिर्यादीच्या डोक्यात धारदार लोखंडी शस्त्राने वार करत होते.
तो त्यांनी हाताने रोखला. तेव्हा त्यांनी फिर्यादीच्या पोटरीवर व खांद्यांवर वार करुन गंभीर जखमी केले.
त्यांचा मित्र सलमान शेख हा भांडणे सोडविण्यासाठी आला असताना त्याच्यावरही शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले.
तेथे असलेल्या रिक्षामध्ये बसून हाताने शस्त्रे हवेत फिरवत शिवीगाळ, आरडाओरड करुन अप्पर डेपोच्या दिशेने निघून केले.
पोलिसांनी १६ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
सहायक पोलीस निरीक्षक देशमुख (API Deshmukh) तपास करीत आहेत.
- Manikchand Oxyrich Packaged Water | माणिकचंद ऑक्सिरिच आता नव्या रुपात ! पाण्याची ग़ुणवत्ता कायम ठेवून बॉटल नव्या लाल रंगात
- Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR; पर्वती परिसरातील घटना
The post Pune Crime News | बिबवेवाडी: पार्सल घेताना धक्का लागल्यानंतर अल्पवयीन युवकांकडून तरूणावर खुनी हल्ला appeared first on बहुजननामा.