Header

Pune Crime News | पुण्यात ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, कोंढवा पोलिसांनी छापा टाकून कपड्यांचा साठा केला जप्त

Pune Crime News | पुण्यात ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, कोंढवा पोलिसांनी छापा टाकून कपड्यांचा साठा केला जप्त

Cheating Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुमा कंपनीचा (Puma Company) बनावट लोगो (Fake Logo) वापरुन ग्राहकांना कपड्यांची विक्री करुन फसवणूक (Cheating) केली जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांच्या (Pune Police) पथकासह छापा मारुन लाखो रुपयांचे कपडे जप्त केले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (Pune Crime News) बुधवारी (दि.5) कोंढवा खुर्द येथील जिजामाता कॉम्पलेक्समधील रायबा फॉर मेन्स (Ryba for Men) या दुकानात करण्यात आली.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर (Company Field Officer) महेंद्र सोहन सिंग Mahendra Sohan Singh (वय-36 रा. रसिका सोसायटी, कसबा पेठे पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल दिलीपराव पिसाळ Vishal Diliprao Pisal (वय-28 रा.मोरे चाळ, कोंढवा खुर्द मुळ रा. मुपो व्याहळी कॉलनी ता. वाई, जि. सातारा) याच्यावर कॉपीराईट अॅक्ट (Copyright Act) कलम 63, 64, 65 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर.एन.ए.आय.पी एटोर्नी कंपनीचे फिल्ड ऑफिसर आहेत.
या कंपनीला पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा अधिकृत लोगो व नावाचा गैरवापर करुन कपड्यांची
विक्री करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
त्यापार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन जिजामाता कॉम्पलेक्स मधील रायबा फॉर मेन्स या
दुकानात छापा टाकाला. त्यावेळी दुकानामध्ये पुमा या बँण्डेड कंपनीचा बनावट लोगो व नावाचा वापर करुन ट्रॅक पँट
व टि शर्ट चा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे पुमा कंपनीच्या एकूण 300 ट्रॅक पॅन्ट व 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे
पूमा कंपनीचे 225 नग टि शर्ट जप्त केले आहे. पोलिसांनी या कारवाईत 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन
दुकान मालक विशाल पिसाळ याच्यावर कॉपराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

The post Pune Crime News | पुण्यात ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, कोंढवा पोलिसांनी छापा टाकून कपड्यांचा साठा केला जप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article