Header

Pune Crime News | येरवडा: जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात

Pune Crime News | येरवडा: जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात

Kidnapping Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मुलीच्या नावावर जमीन करुन देण्यासाठी सासरे व त्याच्या नातेवाईकांनी जावयाचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्याला बीडला (Beed) नेले. तेथे त्याला चक्क गोठ्यामध्ये हातपाय बांधून डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चलुत सासरे रमेश गेमा राठोड व इतर नातवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोम गेता राठोड (सर्व रा. शाहुनगर, पिंपळा गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आडे यांनी त्यांची पत्नीचे नावावर जमीन करावी,
अशी त्यांच्या सासर्‍यांची मागणी होती. मात्र, त्याला फिर्यादी यांनी नकार दिला होता.
या कारणावरुन सासर्‍यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने ४ सप्टेबर रोजी फिर्यादी यांचे तोंड दाबून स्कॉपियोमध्ये बसविले.
त्यांना बीडमध्ये नेले. तेथे गेल्यावर गोठ्यामध्ये दोरीने हातपाय बांधून डांबून ठेवले. फिर्यादींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण (Marhan) केली. पत्नी आर्तिका हिच्या नावावर जमीन कर नाही तर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. ६ सप्टेबर रोजी फिर्यादी यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक होले (PSI Hole) तपास करीत आहेत.

The post Pune Crime News | येरवडा: जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article