Header

Pune Crime News | उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात

Pune Crime News | उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात

Firing

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | शायनिंग करण्यासाठी त्याने बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल (Desi Pistol) मिळविले होते. ते मित्राला दाखविले. पिस्तुल पाहत असताना अचानक त्याचा चाप ओढला गेल्याने गोळी (Firing In Pune) सुटून ती मित्राच्या मानेत घुसली. या घटनेत अभय छबन वाईकर Abhay Chaban Waikar (वय २२, रा. सांगरुण, ता. हवेली) हा जखमी झाला असून त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार करण्यात येत आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जखमी अभय वाईकर व अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे Avishkar alias Monya Tukaram Dhanwade (वय १९, रा. सांगरुण, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अभय वाईकर व अविष्कार धनवडे हे दोघेही काही काम धंदा करत नाही.
सांगरुण गावातील गणपती मंदिरात बुधवारी रात्री दहा वाजता ते जमले होते.
अभय वाईकर याने एक गावठी पिस्तुल मिळविले.
ते त्याने अविष्कार याला दाखवत त्यांच्यावर शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला.
अविष्कार याने ते पिस्तुल त्याच्याकडून घेऊन पहात असताना अचानक त्याच्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला
व गोळी सुटून ती अभय याच्या मानेत घुसली. त्याला तातडीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने
त्याचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पवार (API Pawar) तपास करीत आहेत.

Pune Dahi Handi 2023 | हरे कृष्ण ! शेकडो बालगोपाल, हजारो तरूण-तरूणींच्या उपस्थितीत फोडली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळाची मानाची दहीहंडी

Pune News | मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ‘गदर-2’ चित्रपटाचा स्पेशल शो

Pune News | शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 32 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

The post Pune Crime News | उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article